बोधकथा
===================================================================
====================================================
उशीर
महात्मा गांधी नियमांचे पालन अतिशय काटकोरपणे करत असत. ते प्रत्येक नियम मोठ्या विचारपूर्वक तयार करत असत. स्वतः ही काटेकारपणे पालन करीत. त्यांच्या आश्रमात जेवणासाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा घंटा वाजवून सूचना देण्यात येत असे. जो दुस या घंटेनंतर येत असे त्याला दुस या पंक्तीत बाहेर उभे राहावे लागत असे. अगदी त्या पंक्तीत जागा रिकामी असली तरी ! गांधीजी त्यास उशिरा येण्याची गोड शिक्षा संबोधत असत. दुस या घंटेनंतर नियमाप्रमाणे भोजनगृहाचे दरवाजे बंद केले जात असत. मग कोणालाही आत प्रवेश नसे. एकदा स्वतः गांधीजींना उशीर झाला. दरवाजा बंद करणारे आश्रमवासी गांधीजींना येताना पाहून घुटमळले. तेवढ्यात महादेव भाईंनी त्यांना सांगितले, काय आपल्याला बापूजींकडून शिक्षा घ्यायचीय का ? लवकर दरवाजा बंद करा . नियमाप्रमाणे गांधीजीं व्हरांड्यात उभे राहिले.
नियमांचे पालन होत आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्याचवेळी तेथे हरिभाऊ उपाध्याय आले व बापूजींना उभे पाहून म्हणाले, बापूजी, आज आपणही गुन्हेगारांच्या रांगेत आलात ? जेवणास उशिरा आल्यामुळे ही गोड शिक्षा तुम्हालाही भोगावी लागत आहे.
तात्पर्य - वेळ ही मूल्यवान संपत्ती आहे .
=======================
फुलांची शिकवण
फुलांचे एक गाव होते. त्या गावाशेजारीच दगडांचे गाव होते. दगडांना फुलांचा खूप राग येई. कारण कोणीही फुलांनाच महत्त्व देत असे. प्रत्येक जण फुलांचीच स्तुती करत असे.
कोणीही दगडांना चांगले म्हणत नसत. दगडांना याचे खूप दु:ख होई. अनेक वर्षे त्यांच्या मनात हे दु:ख साठलेले होते.
एकदा काहीतरी कारण घडले. दोन्ही गावांत भांडण झाले. दगडांचा राग उसळून आला. त्यांनी फुलांवर जोरदार हल्ला चढवला. सर्व फुलांना नष्ट करायचे असे त्यांनी ठरवले. प्रत्येक दगड एकेका फुलाला ठेचू लागला. फुले मात्र अजिबात प्रतिकार करत नव्हती. जरासाही दु:खाचा उद्गार काढत नव्हती. उलट प्रसन्नपणे हसत होती.
दगडांना फुलांचे आश्चर्य वाटते. त्यांनी फुलांना विचारले," आम्ही तुम्हाला इतके ठेचतो तरी तुम्ही हसता कसे?" फुलांनी उत्तर दिले," तुम्ही आम्हाला जितके अधिक चिरडता, तितका अधिक सुगंध सर्वत्र पसरतो. त्याचा आम्हाला आनंद होतो."
तात्पर्य :- स्वत: दु: ख सोसून इतरांना आनंद देण्यातच सुख असते.
=======================================
शेळी, करडू आणि लांडगा
एक शेळी सकाळी उठून चरण्यासाठी रानात जाण्यास निघाली. त्यावेळी ती आपल्या करडास म्हणाली, "बाळ, आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे.' सगळ्या लांडग्याचा सत्यानाश होवो' असे शब्द जो उच्चारील त्यासच आत घे, इतरांस दार उघडू नको.' हे भाषण एका लांडग्याने आडून ऐकले आणि शेळी बाहेर जाताच, खोपट्याच्या दारापाशी येऊन तो म्हणाला, "सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो' शेळीने सांगितलेले शब्द उच्चारताच करडू दार उघडील असे त्यास वाटले होते, पण त्या करडास त्याचा शब्द ऐकून संशय आल्यामुळे, त्याने दार उघडले नाही. ते लांडग्यास म्हणाले, "तू जर बोकड आहेस, तर तुला दाढी कशी नाही?' हा प्रश्न ऐकून लांडगा ओशाळला आणि निमूटपणे चालता झाला.
तात्पर्य:- फसवेगिरी करणाऱ्या माणसासंबंधात शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.
=======================================
तात्पर्य :- चुका काढणे जितके महत्वाचे तितकेच त्या सुधारणे महत्वाचे असते.
एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले
असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर
भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या
थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो,
गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने
मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले."
ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे
चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेही जण पाण्यात
उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक
पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो.
ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या
मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो.
जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका
दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या
दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात
घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही
तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले
आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?"
लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच
लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि
विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण
जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले
जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.
तात्पर्य :-"माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."
एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होते आणि दोघे वेगळे होतात.
बरीच वर्षे जातात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो तर काही कुत्र्यांनी त्या वाघाच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो...
दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?".
वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण बळ येईल"
तात्पर्य :-"फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू.. जेणेकरून कुत्र्यांना पण बळ येईल."
संधीचा फायदा
प्राचीन काळी एक राजा जंगलात शिकारासाठी गेला. रस्ता भटकल्यामुळे
राजाचे सैनिक मागेच राहिले. राजाला तहान लागली. तेवढ्यात त्याला एक
लाकूडतोड्या दिसला. राजाने त्याच्याकडून पाणी घेतले आणि पिले. त्यानंतर
राजा त्याला म्हणाला- तू माझ्या महालात ये, मी तुला पुरस्कार देईल.
काही दिवसानंतर लाकूडतोड्या राजाला भेटण्यासाठी आला. त्याला पाहून राजाला
खूप आनंद झाला आणि राजाने त्याला चंदनाच्या झाडांची एक मोठी बाग भेट दिली.
लाकूडतोड्या चंदनाची बाग मिळाल्यामुळे खूप आनंदी झाला. आता आयुष्य आरामात
व्यतीत होणार असे त्याला वाटले. परंतु लाकूडतोड्याला चंदनाचे महत्त्व
माहिती नव्हते. लाकूडतोड्या रोज चंदनाचे एक-एक झाड तोडून कोळसा तयार करू
लागला आणि विकून पोट भरू लागला. काही दिवसांमध्येच चंदनाची सुंदर बाग एक
ओसाड जमीन बनली आणि त्यावर कोळशाचा ढेर लागला होता. बागेत आता फार थोडी
चंदनाची झाडे शिल्लक राहिली होती. ही झाडे लाकूडतोड्याला सावली देत होते.
एके दिवशी राजा त्या बागेत आला आणि तेथील परिस्थिती पाहून
आश्चर्यचकित झाला. राजा लाकूडतोड्याला म्हणाला- मी तुला चंदनाची हिरवीगार
बाग दिली होती आणि तू हे काय करून ठेवले. लाकूडतोड्याने राजाला संपूर्ण
गोष्ट सांगितली. लाकूडतोड्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राजाने त्याला
चंदनाचे एक छोटेसे लाकूड दिले आणि बाजारात विकून येण्यास सांगितले.
लाकूडतोड्याला त्या लाकडाचे चांगले पैसे मिळाले. त्याने ही गोष्ट जाऊन
राजाला सांगितली. राजा म्हणाला- या लाकडाचे मूल्य कोळशापेक्षा कितीतरी
पटीने जास्त आहे. राजाचे शब्द ऐकून लाकूडतोड्याला आपल्या चुकीची जाणीव झाली
परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लाकुडतोड्या आपल्या नशिबाला दोष देऊ
लागला. त्यानंतर लाकूडतोड्या आपल्या गावी निघून गेला. सर्वांना आयुष्यात
कधी न कधी पुढे जाण्याची संधी मिळते. काही लोक या संधीचा फायदा घेतात तर
काही लोक ती संधी ओळखूच शकत नाहीत. यामुळे ते पुढे जात नाहीत.
*तात्पर्य -* कधीही नशिबावर अवलंबून राहू नये. संधी ओळखून लाभ घ्यावा.
===================================================================
व्यवहारज्ञानाचे धडे
एका शहरात दररोज संध्याकाळी एक महात्मा प्रवचन देत असे. त्यांची ख्याती
एका धान्याच्या व्यापा-यानेही ऐकली होती. तो आपल्या मुलासोबत प्रवचन
ऐकण्यास आला. प्रवचन सुरु झाल्यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही
ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना ते म्हणाले,’’या जगात जितके प्राणी
आहेत. त्या सर्वांमध्ये आत्मा वावरत असतो.’’ ही गोष्ट व्यापा-याच्या
मुलाला हृदयस्पर्शी वाटली. त्याने मनोमन हा विचार आचरणात आणण्याचा
संकल्प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्हा त्याच्या
वडिलांनी त्याला काही वेळ दुकान सांभाळण्यास सांगितले. ते स्वत: दुस-या
कामासाठी बाहेर निघून गेले. त्यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली.
दुकानासमोर ठेवलेले धान्य खाऊ लागली. मुलाने त्या गायीला हाकलण्यासाठी
लाकूड उचलले पण त्याच्या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव
आहे.मग भेदभाव का मानायचा? ती धान्य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात
व्यापारी तेथे आले त्याने गायीला धान्य खाताना पाहून मुलाला म्हणाले,’’
अरे तुझ्यासमोर ती गाय धान्य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्यासारखा गप्प
बसून का आहेस? आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्पना आहे की नाही?
तिला हाकलून का दिले नाहीस?’’ मुलगा म्हणाला,’’ बाबा, काल तर महाराज
म्हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्ये पण एक जीव पाहिला’’
तेव्हा व्यापारी म्हणाले,’’मूर्खा, अध्यात्म आणि व्यापार यात गल्लत
एकसारखे करायची नसते.’’
तात्पर्य:- सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्यास जीवन सुखदायी होते.
उशीर
महात्मा गांधी नियमांचे पालन अतिशय काटकोरपणे करत असत. ते प्रत्येक नियम मोठ्या विचारपूर्वक तयार करत असत. स्वतः ही काटेकारपणे पालन करीत. त्यांच्या आश्रमात जेवणासाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा घंटा वाजवून सूचना देण्यात येत असे. जो दुस या घंटेनंतर येत असे त्याला दुस या पंक्तीत बाहेर उभे राहावे लागत असे. अगदी त्या पंक्तीत जागा रिकामी असली तरी ! गांधीजी त्यास उशिरा येण्याची गोड शिक्षा संबोधत असत. दुस या घंटेनंतर नियमाप्रमाणे भोजनगृहाचे दरवाजे बंद केले जात असत. मग कोणालाही आत प्रवेश नसे. एकदा स्वतः गांधीजींना उशीर झाला. दरवाजा बंद करणारे आश्रमवासी गांधीजींना येताना पाहून घुटमळले. तेवढ्यात महादेव भाईंनी त्यांना सांगितले, काय आपल्याला बापूजींकडून शिक्षा घ्यायचीय का ? लवकर दरवाजा बंद करा . नियमाप्रमाणे गांधीजीं व्हरांड्यात उभे राहिले.
नियमांचे पालन होत आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्याचवेळी तेथे हरिभाऊ उपाध्याय आले व बापूजींना उभे पाहून म्हणाले, बापूजी, आज आपणही गुन्हेगारांच्या रांगेत आलात ? जेवणास उशिरा आल्यामुळे ही गोड शिक्षा तुम्हालाही भोगावी लागत आहे.
तात्पर्य - वेळ ही मूल्यवान संपत्ती आहे .
=======================
फुलांची शिकवण
फुलांचे एक गाव होते. त्या गावाशेजारीच दगडांचे गाव होते. दगडांना फुलांचा खूप राग येई. कारण कोणीही फुलांनाच महत्त्व देत असे. प्रत्येक जण फुलांचीच स्तुती करत असे.
कोणीही दगडांना चांगले म्हणत नसत. दगडांना याचे खूप दु:ख होई. अनेक वर्षे त्यांच्या मनात हे दु:ख साठलेले होते.
एकदा काहीतरी कारण घडले. दोन्ही गावांत भांडण झाले. दगडांचा राग उसळून आला. त्यांनी फुलांवर जोरदार हल्ला चढवला. सर्व फुलांना नष्ट करायचे असे त्यांनी ठरवले. प्रत्येक दगड एकेका फुलाला ठेचू लागला. फुले मात्र अजिबात प्रतिकार करत नव्हती. जरासाही दु:खाचा उद्गार काढत नव्हती. उलट प्रसन्नपणे हसत होती.
दगडांना फुलांचे आश्चर्य वाटते. त्यांनी फुलांना विचारले," आम्ही तुम्हाला इतके ठेचतो तरी तुम्ही हसता कसे?" फुलांनी उत्तर दिले," तुम्ही आम्हाला जितके अधिक चिरडता, तितका अधिक सुगंध सर्वत्र पसरतो. त्याचा आम्हाला आनंद होतो."
तात्पर्य :- स्वत: दु: ख सोसून इतरांना आनंद देण्यातच सुख असते.
=======================================
शेळी, करडू आणि लांडगा
एक शेळी सकाळी उठून चरण्यासाठी रानात जाण्यास निघाली. त्यावेळी ती आपल्या करडास म्हणाली, "बाळ, आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे.' सगळ्या लांडग्याचा सत्यानाश होवो' असे शब्द जो उच्चारील त्यासच आत घे, इतरांस दार उघडू नको.' हे भाषण एका लांडग्याने आडून ऐकले आणि शेळी बाहेर जाताच, खोपट्याच्या दारापाशी येऊन तो म्हणाला, "सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो' शेळीने सांगितलेले शब्द उच्चारताच करडू दार उघडील असे त्यास वाटले होते, पण त्या करडास त्याचा शब्द ऐकून संशय आल्यामुळे, त्याने दार उघडले नाही. ते लांडग्यास म्हणाले, "तू जर बोकड आहेस, तर तुला दाढी कशी नाही?' हा प्रश्न ऐकून लांडगा ओशाळला आणि निमूटपणे चालता झाला.
तात्पर्य:- फसवेगिरी करणाऱ्या माणसासंबंधात शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.
=======================================
ईश्वर
एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकोप्तर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो.
तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकोप्तर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या.
तात्पर्य:- तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका.
मोठेपणा
एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठया मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.' तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, 'अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का?'
तात्पर्य :- आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.
फुलांची शिकवण
फुलांचे एक गाव होते. त्या गावाशेजारीच दगडांचे गाव होते. दगडांना फुलांचा खूप राग येई. कारण कोणीही फुलांनाच महत्त्व देत असे. प्रत्येक जण फुलांचीच स्तुती करत असे.
कोणीही दगडांना चांगले म्हणत नसत. दगडांना याचे खूप दु:ख होई. अनेक वर्षे त्यांच्या मनात हे दु:ख साठलेले होते.
एकदा काहीतरी कारण घडले. दोन्ही गावांत भांडण झाले. दगडांचा राग उसळून आला. त्यांनी फुलांवर जोरदार हल्ला चढवला. सर्व फुलांना नष्ट करायचे असे त्यांनी ठरवले. प्रत्येक दगड एकेका फुलाला ठेचू लागला. फुले मात्र अजिबात प्रतिकार करत नव्हती. जरासाही दु:खाचा उद्गार काढत नव्हती. उलट प्रसन्नपणे हसत होती.
दगडांना फुलांचे आश्चर्य वाटते. त्यांनी फुलांना विचारले," आम्ही तुम्हाला इतके ठेचतो तरी तुम्ही हसता कसे?" फुलांनी उत्तर दिले," तुम्ही आम्हाला जितके अधिक चिरडता, तितका अधिक सुगंध सर्वत्र पसरतो. त्याचा आम्हाला आनंद होतो."
तात्पर्य :- स्वत: दु: ख सोसून इतरांना आनंद देण्यातच सुख असते.
उंदीर, कोंबडा आणि मांजर
एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हलत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.
तात्पर्य :- बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.
फटकळपणा
एका गावात एक शेतकरी राहत होता. शेती करण्याशिवाय त्याने काही गाई पाळल्या होत्या. त्यांचे दूध विकून तो गुजराण करत असे. शेतकरी प्रामाणिक होता. त्यामुळे तो दुधात मुळीच भेसळ करत नसे. त्यामुळे त्याचे दूध चांगलेच असणार याची लोकांना खात्री पटली होती. गावातील बहुतांश लोक त्याचेच ग्राहक होते. त्याच्या नियमित ग्राहकांमध्ये एक महिला देखील होती. तिचा स्वभाव रागीट होता. शेतकर्याला तिचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो प्रथम तिच्या घरी दूध पोहोचवत असे. एके दिवशी त्या महिलेने घरी पूजापाठ आयोजित केला होता. बरेच नातेवाईक येणार होते. परंतु नेमके त्या दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध देण्यास जाऊ शकला नाही. शेतकऱ्याच्या या वागण्यामुळे ती महिला प्रचंड संतापली. त्याच्या या वागण्याचा तिला खूप रागही आला. पर्यायी व्यवस्था करून तिने कार्यक्रम पार पाडला. दुसऱ्या दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध घेऊन गेला. तेव्हा तिने त्याचा बराच पाणउतारा केला. बराच वेळ तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होता. शेतकरी गप्प राहिला. काही वेळाने तिच्या रागाचा पारा किंचित कमी झाला, तेव्हा धाडस करून शेतकरी बोलला, ‘माझ्यामुळे तुमची गैरसोय झाली. त्याबद्दल मी प्रथम आपली क्षमा मागतो. परंतु काल माझ्या आईचे निधन झाले. मला तिच्यावर अग्निसंस्कार करावे लागले. त्यामुळे मी दूध द्यायला येऊ शकलो नाही.’ हे ऐकताच महिलेला तिची चूक उमगली. शरमेने तिला काहीच बोलता येईना. रागाच्या भरात भलतीच चूक आपण केल्याचा तिला पश्चात्ताप झाला. तिने शेतकऱ्याची माफी मागितली व यापुढे मागचा-पुढचा विचार न करता कुणाशीही फटकळपणे न वागण्याची तिने शपथ घेतली. तात्पर्य:- अतिउत्साह, घाई-गडबडीत, समोरच्या व्यक्तीची अडचण जाणून न घेता अनुचित व्यवहार करणे योग्य नाही. गैरसोय झाली तर प्रथम त्याचे कारण शोधावे आणि नंतरच त्यावर प्रतिक्रिया द्यावी.
देशभक्तीची परीक्षा
ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील. देशाला लढूनच, प्रसंगी रक्त सांडूनच, हक्कासाठी भांडूनच स्वातंत्र्य मिळेल अशा विचारसरणीचे काही क्रांतीकारक होते. तर अहिंसेच्या मार्गानेच देश स्वतंत्र करता येईल असा काहींना विश्र्वास होता. एक लहान मुलगाही हे सगळे पाहून देशभक्तीची प्रेरणा घेत होता. आपल्या मुलामध्ये देशभक्ती ठासून भरलेली असल्याचे त्याच्या आईलाही जाणवले तेव्हा तिला खूप आनंद झाला. देश गुलामीच्या जोखडातून मुक्त झाला तर बरे होईल अशी भावना होती. पण मुलगा जर पोलीसांच्या तावडीत कधी सापडला तर जे देशासाठी भूमिगत राहून लढा देत आहेत त्यांची नावे व ठिकाणे तो उघड करेल अशी भीती तिला वाटत राहायची. यासाठी तिने त्या मुलाची परीक्षा घ्यायचे ठरवले. आईने मुलाला जवळ बोलावले व आपल्या मनातील ही भावना त्याला सांगितली. आईने मुलाला परीक्षा घेणार असल्याचेही सांगितले. मुलाने परीक्षेसाठी होकार दिला. आईने दिवा पेटवला व त्याच्या ज्योतीवर त्या मुलाला बोट धरायला सांगितले. त्या मुलाने जराही न घाबरता त्या ज्योतीवर हात धरला. हाताला पोळत असताना आईने त्याला क्रांतीकारकांची नावे सांगण्यास सांगितले पण मुलाने हुं की चूं सुद्धा केले नाही. मुलाचे हे धाडस पाहून आईने मुलाला कवटाळले. हाच मुलगा मोठेपणी एक महान क्रांतीकारक झाला. त्या मुलाचे नाव होते- अशफाक उल्लाह खान.
तात्पर्य :- असंख्य देशभक्तांनी केलेल्या त्यागामुळे,बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.
तृप्तता मानवाची गरज
प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्य करत होता. त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच एक संन्याशीबुवा आपल्या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्चर्य वाटले. संन्याशाने राजाला पाहिले व तो म्हणाला, '' हे राजन, जर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.'' राजाला त्याच्या बोलण्याचा रागही आला आणि आश्चर्यही वाटले. राग यासाठी की राजाला तो तुम्हाला शक्य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्चर्य वाटले. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्या आता सोन्याच्या मोहोरांनी भरून टाकावे व सन्मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्यांदा ताट भरून सोन्याच्या मोहोरा आणल्या आणि भिक्षापात्रात टाकल्या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्याच्या मोहरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती. राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्चित काय होते आहे की आपण टाकलेल्या मोहोरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते. शेवटी सोन्याच्या मोहोरा संपल्या, राजाचा खजिना रिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्लक होतीच. मग राजाला समजून चुकले की हा काही तरी दैवी प्रकार आहे. त्याने संन्याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्हणाला,''हे साधूमहाराज, मला क्षमा करावी, मी संपत्ती व सत्तेच्या गर्वात तुम्हाला व तुमच्या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. पण या भिक्षापात्राचे रहस्य काय आहे हे कृपया मला सांगावे.'' संन्याशी उत्तरला,'' राजा, हे भिक्षापात्र म्हणजे आपल्या हृदयाचे प्रतिक आहे. या संसारातील कोणतीच वस्तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्याने कितीही नाव कमावले, शक्ति मिळविली, धन प्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्र्वरी कृपेचा एक किरण आपल्या हृदयाला भरू शकतो पण मनुष्य तो मिळविण्याचा कधीच प्रयत्न करत नाही.
तात्पर्य:- तृप्तता हि खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे.
खटला
दोघां भावात जमिनीवरून तंटा निर्माण झाला*. मामला कोर्टात पोहोचला. त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते. न्यायाधिशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्हणाला, माझ्या वाडवडिलांची देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे.’’ यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व *श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला*.
तात्पर्य :- मिळालेले धन हे टिकवून ठेवणे अवघड आहे.
अचुक निर्णय
एक साधा भोळा खेड्यातला उंदीर होता. त्याच्याकडे एक धष्टपुष्ट व गोजिरवाणा असा शहरातला उंदीर आला. खेड्यातल्या उंदराने आपल्या पाहुण्याचा चांगला आदरसत्कार केला. आपल्या घरातले काही पदार्थ, जवळच्या शेतातील कोवळी कणसे, वाटाण्याच्या शेंगा व भाकरीचे तुकडे त्याला दिले.
पण खेड्यातले हे अन्न त्या शहरातल्या उंदराला आवडले नाही. मग तो त्या खेड्यातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, तुला जर राग येणार नसेल तर मी थोडं मनमोकळेपणाने बोलतो, अरे अशा ह्या कंटाळवाण्या जागेत तू राहतोस कसा? हे रान, आसपास गवत, झाडं, डोंगर नि पाण्याचे ओहळ याशिवाय दुसरं काही नाही. इथल्या पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा माणसाचा आवाज बरा नाही का ? या ओसाड रानापेक्षा राजधानी बरी म्हणायची. विचार कर आणि ही जागा सोडून माझ्याबरोबर शहरात चल, तिथे तुला बरंच सुख मिळेल.'
हे सगळे वर्णन ऐकून त्या खेड्यातल्या उंदराला मोह झाला व दोघे सकाळी खेड्यातून निघून रात्री शहरात पोहोचले. थोडे पुढे गेले तर तेथे त्यांना एक मोठा वाडा दिसला. आदल्या दिवशीच तेथे लग्नसमारंभ झाला होता. त्या वाड्याच्या आत जाऊन ते स्वैपाक घरात शिरले. तेथे नाना प्रकारचे पदार्थ होते. पण माणसे कोणी नव्हती. ते पाहून खेड्यातला उंदराला मोठा आनंद झाला. तेव्हा शहरातला उंदीर त्याला म्हणाला, 'तू खोलीच्या मध्यभागी बस. मी एक एक पदार्थ देईन, तो खाऊन पहा आणि त्याची चव कशी काय आहे ते मला सांग !' मग तो एकेक पदार्थ आपल्या पाहुण्याला देउ लागला व तो चाखून 'अहाहा ! काय चविष्ट पदार्थ आहे हा !' असे म्हणून तो खेड्यातला उंदीर त्याचे कौतुक करू लागला.
अशा प्रकारे एक तास मोठ्या आनंदात गेला. इतक्यात स्वैपाक घराचे दार उघडले गेले व ते पाहून दोघेही उंदीर एका कोनाड्यात जाऊन लपले. इतक्यात दोन मोठे बोके तेथे आले व त्यांनी मोठ्याने आवाज केला. तो ऐकून खेड्यातला उंदीर भीतीने घाबरला, त्याची छाती धडधडू लागली. मग तो हळूच शहरातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, असंच जर तुझं शहरातलं सुख असेल तर ते तुझं तुलाच लखलाभ होवो. मला खेडंच बरं, तिथल्या रानातल्या शेंगा बर्या पण रात्रंदिवस जिवाला भिती असणारी ही इथली पक्वान्न मला नकोत.'
तात्पर्य :- शहरात सुख फार पण त्याप्रमाणे दुःखेही फार. खेड्यात मजा कमी पण त्या मानाने दुःखे व संकटेही कमी असतात.
श्रमाचे महत्त्व
"धनासेठचा मुलगा खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे असे दे हरी पलंगावरी किती दिवस चालणार कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल.
दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.'
दुसर्या दिवशी, आईकडून त्याला एक रूपया मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला.
मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला.
स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा प्रवासी माणूस दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'.
तिसर्या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले.
शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे.
ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?'
दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.' तात्पर्य :-"स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई. श्रमाचे महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा आपण स्वतः कमवतो. "
कोंबडी आणि कोल्हा
एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्याने खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.
तात्पर्य :- वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.
स्वप्न आणि सत्य
एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता ’भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्या पित् याकडे गेले. पित्याला वादाचा विषय सांगितला. पिता म्हणाला,’’ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्याचा भविष्य घडविण्यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्वप्नाने एकाच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्हाच उचलले गेले होते. मग सत्याने प्रयत्न केला मात्र त्याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्न केले पण दोघेही अयशस्वी राहिले. शेवटी थकून ते पुन्हा एकदा पित्याकडे गेले तेव्हा पिता म्हणाला,’’ भविष्य घडविण्यात सत्य आणि स्वप्न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’
तात्पर्य :- खऱ्या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खाद्यावर उभे राहायला हवे.
असंगाचा संग
एका गृहस्थाकडे एक बैल होता. तो संध्याकाळी इतर गुरांबरोबर नेहमी वेळेवर घरी जायचा. परंतु एके दिवशी तो घरी न येता दुस-या बैलांबरोबर एका शेजा-याच्या वाडयात निघून गेला. वाडयात शिरल्यावर पोटभर खाऊन मनमुराद नासधूस करून इतर बैल विश्रांती घेत होते व तेथेच थोडा वेळ शांत बसले . इतक्यात वाडयाचा मालक काठी हातात घेऊन धावत आला. तेथील बैलांना नेहमीचीच सवय असल्याकारणाने मालकाला चुकवून ते मार न खाता एकदम पसार झाले. परंतु त्या गरीब बैलाला असली मुळीच सवय नसल्यामुळे कोणत्या बाजूने पळून जावे हे त्याला सुचेना , आणि अखेरीस बराच चोप दिल्यावर मालकाने त्याला जाऊ दिले. मध्यरात्री घरी आल्यावर त्याचा मालक त्याला पाहण्यास आला बैलाच्या पाठीवर वळ त्याच्या दृष्टीस पडले. मालकाने त्या माराचे कारण मनात समजून एक भले मोठे लोढणे त्याच्या गळ्यात अडकवून दिले. जेणेकरून त्याला पळता येईना. अर्थातच त्यानंतर तो कधी दुसर्याच्या वाडयात शिरलाही नाही. सद्गुणी असतानाही एका प्रसंगाने त्याच्या गळ्यात कायमचे लोढणे अडकले.
तात्पर्य:- असंगाचा संग करण्याच्या दोषाने चांगल्या बुद्धीला भ्रम झाला कुसंगती थोडा वेळ जरी प्राप्त झाली तरी ती अब्रुला हानीकारक होते.
आत्मनियंत्रणाचे महत्व
एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते.
तात्पर्य:- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.
आत्मनियंत्रणाचे महत्व
साधू आणि यक्ष
एक साधू तपश्चर्येस एका निर्जन स्थळी बसले होते. त्या ठिकाणी एका यक्षाचे वास्तव्य होते. या गोष्टीची साधूला कल्पना नव्हती. ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा निर्जन स्थान पाहून त्यांनी तेथेच ध्यानधारणा सुरु केली. त्या वेळी यक्ष तेथे नव्हता. रात्री जेव्हा यक्ष तेथे आला तेव्हा आपल्या जागेवर दुस-यास व्यक्तीला पाहून त्याला राग आला. त्याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्थेत असलेल्या साधूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्यांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ध्यानस्थ असल्याने त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्याचा प्रयत्न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्हा अशा जंगली प्राण्यांची रूपे घेतली तरी साधूच्या ध्यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्याने विषारी सापाचे रूप धारण करून त्यांना दंश केला तरीही त्यांच्यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्या प्रयत्नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्याने यक्ष झालेल्या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्या कृपादृष्टीने सापाच्या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्याने त्यांना आदरपूर्वक वंदन केले.
एकीचे बळ सर्वश्रेष्ठ
एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.
तात्पर्य :- एकीचे बळ मोठे असते.
क्रांतिकारी उधमसिंह
सन १९१९ मध्ये जालियनवाला बागेत एक आमसभा सुरु होती. इंग्रज सरकारचा अधिकारी जनरल डायरने निर्दोष लोकांवर गोळीबार केला. शेकडो लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली, क्रांतिकारकामध्येही या घटनेने वातावरण ढवळून निघाले आणि संतापाचा उद्रेक होण्याची वेळ झाली. उधमसिंह नावाच्या क्रांतीकारकाने जनरल डायरचा बदला घेण्याचा विडा उचलला. उधमसिंहानी दिवस आणि वेळ ठरवून जनरल डायरवर गोळी झाडली. परंतु ते पकडले गेले. त्यांच्यावर खटला भरला गेला. न्यायाधीशांसमोर त्यांना उभे केले असता न्यायाधीशांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी गर्दीतून वाट काढत एक इंग्रज तरुणी पुढे आली व तिने न्यायाधीशांकडे उधमसिंह यांना प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. त्यांनी तिला परवानगी दिली. त्या मुलीने उधमसिंह यांना एकच प्रश्न विचारला," तुम्ही ज्यावेळेला गोळ्या झाडल्या त्यावेळी अजूनही तुमच्या पिस्तुलात तीन गोळ्या शिल्लक होत्या. मी पण इंग्रज आहे, मलाही इंग्रज या नात्याने तुम्ही का मारले नाही. तसे करून तुम्ही पळून जावू शकला असता पण तुम्ही गेला नाहीत. असे का केले याचे उत्तर द्या!" उधमसिंह यांनी त्या तरुणीला ओळखले, तिच्याकडे पाहून मंदस्मित केले व म्हणाले,"भगिनी! आम्ही भारतीय आहोत. महिलेवर हात उचलणे आमच्या संस्कृतीविरुद्ध आहे. त्यामुळे मी आपल्यावर गोळी झाडली नाही. तसे करणे आम्हा भारतीयांना शोभले नसते." हे उधमसिहांचे विचार ऐकून न्यायालय व ती तरुणी चकित झाले.
तात्पर्य :- नीतिवान मनुष्य प्रतिकूल परिस्थितीतही संस्कृतीप्रमाणे आचरण करतो. नैतिकता हि संस्कारातून येते. संस्कारहीन माणसे हीन दर्जाचे वर्तन करतात.
दानवीर कर्ण
दानवीर कर्ण
कुंतीचा जेष्ठ पुत्र अंगराज कर्ण प्रत्येक दिवशी सुवर्ण दान करत असे. त्यामुळे त्याची ख्याती दानवीर अशी झाली होती. महाभारताच्या युद्धात त्याला वीरगती प्राप्त होऊन जेंव्हा तो स्वर्गात गेला तेंव्हा त्याला तिथे आदराची वागणूक मिळाली, सत्कारपूर्वक वागविण्यात आले. देवराज इंद्राने त्याचे स्वागत केले. सुवर्णजडीत महालात त्याची राहण्याची व्यवस्था केली. त्या महालात सर्व वस्तू सोन्यापासून बनविलेल्या होत्या. हे पाहून राजा कर्णाला आपण जीवनभर केलेल्या सुवर्ण दानाचा गर्व झाला. काही वेळ सोन्याच्या पलंगावर विश्रांती घेतल्यावर कर्णाला तहान लागली. त्याने सेवकाला पाणी आणण्यास सांगितले. सेवकाने सोन्याच्या पेल्यात पातळ झालेले सोन्याचे पाणी आणून दिले. कर्णाला मनातल्या मनात खूप राग आला. परंतु तो काहीच न म्हणता तहानलेलाच झोपला. संध्याकाळी भोजनाच्या वेळी सेवक सोन्याच्या ताटात सोन्याची पोळी, सोन्याची भाजी घेवून आला तेंव्हा मात्र ते पाहून कर्ण संतापला. तो तातडीने देवराज इंद्राकडे गेला. त्याने त्रस्त होवून इंद्राकडे तक्रार केली कि इथे पाणी मागितले तर सोन्याचे आणि अन्न हि सोन्याचे असे का?. देवराज इंद्राने उत्तर दिले,"अंगराज! स्वर्गलोकामध्ये प्राणी त्या वस्तूंचा उपयोग करू शकतात ज्याने आपल्या जीवनकाळात कुणाला सुख संतोष दिला असेल. कारण कि आपण अन्न व पाण्याचे दान न करता सदैव सोन्याचे दान केले त्यामुळे तेच आपल्याला इथे मिळेल" कर्णाला आपली चूक समजून आली. 'अन्न व पाण्याला मी विशेष महत्व दानामध्ये दिले त्यामुळे त्याचे दान करण्याचा मी विचारच नाही केला. आता तुम्ही मला जीवनभराच्या पुण्याच्या मोबदल्यात केवळ १६ दिवसांसाठी मला पृथ्वीलोकात पाठविण्यात यावे." अशी विनंती त्याने इंद्राकडे केली. इंद्रानेही त्याची ती विनंती मान्य केली. १६ दिवस कर्णाने पृथ्वीवर राहून अन्न, पाणी व वस्त्राचे दान केले आणि पुन्हा स्वर्गात आला. आता स्वर्गात त्याला कोणतेही कष्ट नव्हते.
तात्पर्य :- अन्न, पाणी, वस्त्र या मुलभूत गरजा आहेत. ज्यांना त्याची गरज आहे अशा लोकांना ते दान केल्याने आपल्याला समाधान मिळते. सुखापेक्षा संतोष मोठा असतो आणि धनापेक्षा मोठी शक्ती असते.
आईवडिलांचे प्रेम
एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं.आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’तो तरुण म्हणाला, ‘आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ यावर आई म्हणाली, ‘मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मगासपासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?’ वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटपणे कोयती उचलून बागेतून हसत हसत घरात गेला.
तात्पर्य:- स्वत:पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.
पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या अंतकरणात प्रत्येक प्राणीमात्राबद्दल असलेली करुणा पाहून लोक त्यांना 'विद्यासागर' च्या ऐवजी करुणा सागर असे म्हणत असत. असहाय्य प्राणीमात्रावर त्यांची करुणा आणि कर्तव्यपरायणता बघण्यासारखी होती. त्यांच्या आयुष्यात ते कोलकत्ताच्या जवळ असणाऱ्या एका छोट्याशा भागात प्राध्यापक पदावर नियुक्त होते. एके दिवशी संध्याकाळी पावसाने सुरुवात केली. पाऊस पडायला लागला तसे वातावरणही थंड होवू लागले. ईश्वरचंद्र विद्यासागर हे आपल्या कामात व्यस्त होते. ते त्यांच्या अभ्यासात मग्न असतानाच अचानक त्यांच्या दारावर कोणीतरी थाप टाकली. पंडितजी उठले व दरवाजा उघडला तर एक अनोळखी माणूस दारात भिजलेला त्यांनी पाहिला. त्यांनी त्या माणसाला घरात घेतले. अंग पुसण्यासाठी कपडे व आपले स्वतःचे नवीन कपडे त्याला घालण्यासाठी दिले. तो अनोळखी पाहुणा या अचानक झालेल्या स्वागताने अचंबित झाला आणि त्याचा त्या प्रेमाने कंठ दाटून आला. तो पाहुणा म्हणाला," मी या भागात नवीन आहे. मी माझ्या मित्राकडे पाहुणा म्हणून आलो होतो पण त्याच्या घरापाशी गेलो तर तिथे चौकशी केल्यावर मला समजले कि तो गावाला गेला आहे. आता या पावसाच्या रात्री मी खूप जणांकडे आसरा मागितला पण कुणीच मला आसरा दिला नाही. सगळ्यांनी मला हाकलून दिले. तुम्ही पहिली अशी व्यक्ती आहात ज्यांनी मला आसरा दिला आणि मला इतके आदरातिथ्य केले. यावर ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणाले,"अरे मित्र! तुम्ही तर माझे अतिथी आहात. आणि आपल्या शास्त्रात तर अतिथीला देव मानले आहे. मी तर फक्त माझे कर्तव्य केले आहे." हे म्हणत असतानाच त्यांनी त्याच्यासाठी गरम कपडे, अन्न आणि झोपायची व्यवस्था करायला सुरुवात केली. पाहुण्याने गरम जेवण केले व झोपी गेला. सकाळी जेंव्हा तो परत निघाला तेंव्हा ईश्वरचंद्र विद्यासागर त्याला म्हणाले," अतिथी देवा ! झोप कशी झाली?" त्यावेळी त्या पाहुण्याने त्यांना मनोमन नमस्कार करत तो म्हणाला," खरे देव तर तुम्ही आहात, ज्याने संकटकाळात माझ्यासारख्या अनोळखी माणसाला घरात घेवून त्याचे एखाद्या जवळच्या माणसाप्रमाणे बडदास्त ठेवली. अशी देवमाणसे आज दुर्मिळ होत चालली आहेत. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी हे तुमच्यासोबत घालविलेले क्षण कधीच विसरणार नाही."
तात्पर्य:- आपल्या हातून एखाद्या प्राणिमात्राला जर काही मदत करता येत असेल तर ते करणे आपले कर्तव्य ठरते.
सुरक्षितता
एकदा एका हरणाचा एक डोळा निकामी झाला. मग त्याला युक्ती सुचली. त्याने समुद्राच्या काठी फिरायला सुरुवात केली. त्याला वाटले आपल्याला धोका आहे तो जमिनी कडूनच कारण कोणताच शिकारी समुद्रातून येणारच नाही. एक डोळा जमिनीकडे लावून आपल्याला आपल्या अन्नाची सोय करता येईल. एक शिकारी बरेच दिवस त्या हरीणाकडे लक्ष ठेवून होता. बरेच दिवस तो त्याला मारण्यासाठी टपून होता पण ते हरीण काही त्याच्या तावडीत सापडत नव्हते. त्याची शिकार काही त्याला होत नव्हती. जमिनीच्या बाजूने जेंव्हा शिकारीची वेळ येई तेंव्हा हरीण पळून जात असे. मग त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक दिवस एक नाव घेतली व समुद्रामध्ये सकाळपासून फिरत राहिला. अचानक संध्याकाळच्या वेळी त्याने हरणावर गोळी झाडली. नेम अचूक लागला. हरणाला गोळी लागल्यावर हरीण मरणोन्मुख झाले. मरता मरता ते स्वतःशीच म्हणाले,"ज्या डोळ्याने मला दिसत नव्हते तोच डोळा मी समुद्राकडे ठेवून फिरत राहिलो. पण समुद्राच्या बाजूनेच माझा घात झाला. मला समुद्राच्या बाजूची खात्री होती पण त्या बाजूनेच मला मरणाच्या दारात पोचविले."
तात्पर्य :- आपल्या जिथे सुरक्षितता वाटते तिथूनच काही वेळा धोका होऊ शकतो. सुरक्षितता/सावधानता हि सदैव बाळगली पाहिजे.
साधू आणि गवळण
एका गावात एक साधू राहत होता लोक त्याचा फार आदर करत असत. त्या गावात दुसऱ्या गावातून दुध विकण्यासाठी एक गरीब गवळण येत असे. सर्वात प्रथम ती साधूला दुध आणून देत असे. त्यानंतर ती गावातील इतर लोकांकडे दुध वाढत असे. एके दिवशी तिला येण्यास उशीर झाला. साधूने तिला कारण विचारले तेंव्हा तिने उत्तर दिले,"आज नदी पार करायला नाव उशिरा मिळाली, त्यामुळे येण्यास उशीर झाला." साधू हसत म्हणाला" लोक तर ईश्वराच्या नावावर संसारसागर पार करतात आणि तुला नदी पार करायला नाव लागते. असे वाटते कि तुला ईश्वरावर विश्वास नाही." त्या भोळ्या गवळणीवर या बोलण्याचा खूपच परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी पहाटेच ती गवळण साधूच्या आश्रमाच्या दारात साधूला हाक मारू लागली. साधू त्यावेळी अजून झोपलेले होते. तिच्या हाकेने साधू जागा झाला. दार उघडताच तिला पाहून साधू हैराण झाला. त्याने विचारले,"रोजच्या वेळेपेक्षा आज तुम्ही लवकर कशा काय आलात?" गवळण म्हणाली,"महाराज! तुमच्या उपदेशाने माझे काम झाले, नावेची समस्या कायमची संपली. रोजचे भाडे वाचले, आपल्या सांगण्यानुसार ईश्वराचे नाव घेतले आणि नदी पार करून आले" साधूचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. जेंव्हा ती नदीच्या रस्त्याने जाऊ लागली, तेंव्हा साधूही तिच्या पाठोपाठ नदीत गेला. जेंव्हा पाण्याची पातळी वाढली तेंव्हा साधू घाबरून पाण्यात पडला आणि वाचविण्यासाठी आवाज देवू लागला, तेंव्हा गवळणीने त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि विचारले," तुम्ही आपलाच उपदेश अंमलात आणून जर ईश्वराकडे प्रार्थना केली असती तर तुम्ही नदी पार करू शकला असता." गवळणीचा ईश्वरावरील गाढ विश्वास पाहून शरमिंदा झाला.
तात्पर्य :- संदेश लक्ष्यापासून भरकटत असतो आणि विश्वास फळ देत असतो. दृढ निश्चयाने सर्व काही साध्य होते.
करावे तसे भरावे
एक शेतकरी आपल्या गावामधून शहराच्या बाजारात लोणी विकण्यासाठी जायचा. एका दुकानदाराला त्याचे लोणी खूप आवडले. दुकानदाराने शेतकऱ्याला दररोज एक किलो लोणी घेऊन ये असे सांगितले. शेतकरीसुद्धा हे ऐकून खुश झाला. शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली. सामान घेऊन तो घरी आला.
दुसऱ्या दिवसापासून शेतकरी दररोज दुकानावर एक किलो लोणी देऊ लागला. दुकानदारही दररोज शेतकऱ्याला लोण्याचे पैसे देत होता. काही दिवस असेच चालू राहिले. एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या लोण्याचे वजन केले तर ते 900 ग्रॅमच भरले. दुकानदाराला खूप राग आला. पैसे एक किलोचे घेतो आणि लोणी 900 ग्रॅमच देतो, हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही. शेतकरी फसवणूक करत आहे असा विचार त्याच्या मनात आला.
दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या समोरच लोण्याचे वजन केले तर ते 900 ग्रॅमच भरले. आता मात्र दुकानदाराच्या क्रोधाचा पारा अधिकच वाढला. तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाल, "तू मला धोका देत आहेत." शेतकरी म्हणाला "अहो भाऊ, माझ्याकडे वजन करण्यासाठी एक किलोचे मापच नाही. तुमच्याकडून जी एक किलो साखर खरेदी केली होती, त्याचे माप बनवूनच मी लोणी मोजून आणतो."
शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान शरमेने खाली गेली, कारण तो स्वतःच चुकीचे काम करत होता. त्याच्या लक्षात आले की, आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळते.
तात्पर्य:- आपण चुकीचे काम केल्यास आपल्या त्याचे फळही तसेच मिळते. यामुळे जैसी करनी, वैसी भरनी.
जाणीव
बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५ ६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे."
तात्पर्य :- दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते,कदर केली जाते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.
स्वामी अखिलानंद
स्वामी अखिलानंद हरिद्वारमध्ये गंगेकाठी आश्रमात रोज रामायणावर प्रवचन देत असत.एकेदिवशी ते शिष्यांसोबत गंगेकाठी चालत होते.तेव्हा त्यांना आश्रमाच्या शेजारी असलेल्या झाडांवर दोन माणसे बसलेली दिसली.शिष्यांना विचारल्यावर शिष्य म्हणाले, ते दोघे ग्रामीण भक्त असून ते कथा ऐकायला येत असल्याचे सांगितले.त्यांचे फाटलेले कपडे पाहून स्वामीजी विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे अन भक्तीचे मर्म समजणार?प्रसादाच्या आशेने येत असतील दोघे दुसरे काय?त्यांनी त्या दोघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्व विचारले, दोघेही अडाणी आणि अचानक बोलावणे आल्याने भांबावले, त्यामुळे ते दोघेही एक शब्द स्वामीजींपुढे बोलूच शकले नाही.स्वामीजी रागवत म्हणाले, तुम्हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच गर्दी वाढवू नका, रामायण संपल्यावर या तुम्हाला प्रसाद द्यायची व्यवस्था मी करतो.'' दोघेही बिचारे मान-अपमानाची पर्वा न करता स्वामीजींना नमस्कार करून निघून गेले.दुसरे दिवशी मात्र स्वामीजींना खरी भक्ती काय असते हे पुरेपुर समजले, कारण रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि नदी भरून वाहू लागली, यायला वाटही नाही, स्वामींच्या आश्रमातही पाय ठेवायला जागा उरली नाही इतके पाणी झाले.रामायण कथन करण्यासाठी स्वामीजी आले पण समोर कुणीच श्रोता नाही इतक्यात स्वामीजींचे लक्ष समोरच्या झाडाकडे गेले तर कालचेच दोघे ग्रामीण भक्त त्यांच्या रोजच्या जागेवर झाडावर भिजलेल्या अवस्थेत रामायण ऐकण्यासाठी येऊन बसलेले दिसले.स्वामीजींना राहवले नाही व त्यांनी त्या दोघांच्या समोर लोटांगण घातले व त्यांच्या रामभक्तीला नमस्कार केला.
तात्पर्य :- कोणालाही कोणी कमी समजु नयू. कोण कुठल्या अधिकाराचा असेल सांगता येत नाही.
तात्पर्य :- कोणालाही कोणी कमी समजु नयू. कोण कुठल्या अधिकाराचा असेल सांगता येत नाही.
अडचण
एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याने त्याच्या गरिबीमुळे त्याने एका सावकाराकडून काही पैसे उसने घेतले होते. ब्राह्मणाची परिस्थिती इतकी बिघडली की तो काही पैसे परत करू शकत नव्हता. त्यातच सावकाराने त्याला पैसे परत करण्याचा तगादा लावला. ब्राह्मण आपले पैसे परत करत नाही हे पाहिल्यावर सावकाराने त्याची तक्रार देशाच्या बादशहाकडे केली. बादशहाने ब्राह्मणाला बोलावणे पाठवले. ब्राह्मणही मग दरबारात हजर झाला. ब्राह्मण दरबाराच्या दारात येताक्षणी सावकाराने बादशहाला मोठया सुरात सांगण्यास सुरुवात केली,'' महाराज, हाच तो अधम मनुष्य ज्याने माझ्याकडून ५०० रूपये घेतले आणि आता ते परत करण्याचे हा नाव सुद्धा काढत नाही. महाराज, तुम्ही याला माझे पैसे परत करण्याचे आदेश द्यावे ही माझी तुमच्याकडे विनंती आहे.'' बादशहाने ब्राह्मणाकडे सूचक नजरेने पाहिले व ब्राह्मण बोलू लागला,'' महाराज मी याचे पैसे देणे लागतो ही गोष्ट मला मान्य आहे पण महाराज माझी गाय आणि घोडा मी विक्रीस काढली आहे, ती दोन्ही जनावरे विकली गेली की मी या सावकाराचे पैसे व्याजासहीत परत करीन हा माझा शब्द आहे.'' असे ब्राह्मणाने बोलताच सावकाराचा संताप झाला व तो ब्राह्मणाकडे धावून जात मोठमोठ्याने ओरडू लागला व म्हणाला,'' महाराज हा खोटारडा इसम, किती खोटे बोलत आहे ते पहा, अहो महाराज, याच्या घरात याला खायला अन्नाचा कणही नाही आणि हा गायघोडा पाळण्याची भाषा करतो. याच्याकडे फुटकीकवडीसुद्धा नाही की जी विकून हा माझे पैसे परत करेल. महाराज याला शिक्षा करा'' सावकाराचे बोलणे संपताच ब्राह्मण हात जोडून सावकाराला व बादशहाला नम्रपणे म्हणाला,'' महाराज मी खोटे बोललोही असेन पण बघा सावकाराला माझी सर्व आर्थिक परिस्थिती माहिती आहे तरीही ते मला पैशाचा तगादा लावत आहेत. महाराज सर्व दिवस सारखे नसतात आज माझ्याकडे पैसा नाही पण माझ्याकडे पैसे आल्यावर मी सावकाराचे ऋण फेडून टाकीन एवढे खरे.'' बादशहाने ब्राह्मणाच्या बोलण्यातील तळमळ ओळखून स्वत:कडील पैसे सावकाराला दिले व ब्राह्मणाला सन्मानपूर्वक घरी पाठविले.
तात्पर्य:- अडचणीत असणाऱ्याला नेहमीच मदत करावी. तसेच मदत करताना तो खरच अडचणीत आहे की नाही याचीही शहानिशा करणे गरजेचे आहे.
मनाची एकाग्रता
एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''
तात्पर्य :- मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच.
तात्पर्य :- मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच.
उपयोगी जीवन
उपयोगी जीवन
उपयोगी जीवन
एके वेळी काही मजुर दगडाच्या खाणीत काम करीत असता त्यांनी खडकाचा
अर्धा भाग फोडला, इतक्यात त्या दगडाच्या पोटातून चटकन एक मोठा बेडूक उडी
मारून बाहेर आला. हे पाहून त्या मजुरांना फार नवल वाटले व ते त्याच्याकडे
कौतुकाने पहात उभे राहिले. तो बेडूक त्या दगडाच्या आत कसा जन्मला, कसा जगला
याविषयी आपापसात बोलू लागले. त्यांचे बोलणे कानावर पडताच त्या बेडकाला स्वतःविषयी धन्यता व गर्व वाटून तो म्हणाला, 'अरे
बाबांनो, मागचा प्रलय होऊन गेल्यावर जेव्हा भगवंताने पिंपळाच्या पानावर
जन्म घेतला तेव्हाच मी जन्मलो. माझ्या बरोबरीचा असा आज एकही प्राणी या जगात
नाही. भगवंताचं आणि माझं कूळ एकच. अन मीही त्याच्या सारखाच पुढच्या
प्रलयापर्यंत जगणार !'
तो असे बोलत आहे, इतक्यात एक मधमाशी तेथे येऊन म्हणाली, 'बेडका तू फार काळ जगलास आणि तुझा जन्म मोठ्या कुळात झाला असला तरी तुला यात गर्व वाटण्यासारखं काय आहे ? एवढ्या मोठ्या आयुष्याचा तुला काय फायदा ? त्यापेक्षा माझं पहा ? तसं माझं आयुष्य मोठं नाही तरी मी सतत उद्योग करते नि लोकांच्या उपयोगी पडते. नाना प्रकारच्या सुंदर फुलझाडांचा मला उपभोग घेता येतो. सर्वांनी आदर्श बाळगावा असं माझं वर्तन आहे.
मोठ्या कुळात जन्मून अन् हजारो वर्षे जगून, सारं आयुष्य आळसात आणि अज्ञानात घालवलं तर त्याचा उपयोग काय ?'
तात्पर्य :- खरा मोठेपणा अंगच्या गुणांवर अवलंबून असतो. जीवन जगत असतांना माणसाने सतत दुसऱ्याच्या उपयोगी यावे.यातच खरा आनंद आहे.आयुष्याच सोन होईल.!
तो असे बोलत आहे, इतक्यात एक मधमाशी तेथे येऊन म्हणाली, 'बेडका तू फार काळ जगलास आणि तुझा जन्म मोठ्या कुळात झाला असला तरी तुला यात गर्व वाटण्यासारखं काय आहे ? एवढ्या मोठ्या आयुष्याचा तुला काय फायदा ? त्यापेक्षा माझं पहा ? तसं माझं आयुष्य मोठं नाही तरी मी सतत उद्योग करते नि लोकांच्या उपयोगी पडते. नाना प्रकारच्या सुंदर फुलझाडांचा मला उपभोग घेता येतो. सर्वांनी आदर्श बाळगावा असं माझं वर्तन आहे.
मोठ्या कुळात जन्मून अन् हजारो वर्षे जगून, सारं आयुष्य आळसात आणि अज्ञानात घालवलं तर त्याचा उपयोग काय ?'
तात्पर्य :- खरा मोठेपणा अंगच्या गुणांवर अवलंबून असतो. जीवन जगत असतांना माणसाने सतत दुसऱ्याच्या उपयोगी यावे.यातच खरा आनंद आहे.आयुष्याच सोन होईल.!
अर्थ
एक
पंडित स्वतःला फार मोठा विद्वान समजत असे. त्याच्या मनात विचार आला कि
राजाच्या समक्ष राजपुरोहीताशी शास्त्रार्थ केला पाहिजे. मला कोणी हरवू शकत
नाही याचा त्याला गर्व झाला होता. राजपुरोहिताला हरविले कि राजाला आपली
विद्वत्ता माहित होईल आणि त्याद्वारे राजा आपणास बक्षीस पण देईल असे
त्याच्या मनात होते. त्यानुसार ठरवून तो राजदरबारात गेला, त्याने
पुरोहिताला शास्त्रार्थ करण्यासाठी आव्हान दिले. राजपुरोहीताने पंडिताला
प्रथम प्रश्न विचारण्यास सांगितले, पंडिताने प्रश्न केला,"पाच मी, पाच शी,
पाच न मी आणि पाच न शी याचा अर्थ सांगा?" राजपुरोहीताला प्रश्न समजला नाही.
त्याने राज्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागून घेतली.
राजाने मुदत दिली मात्र सात दिवसानंतर मृत्युदंड कबुल असेल तरच. सात दिवसात
पुरोहिताने उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण बुद्धीने,नशिबाने साथ
दिली नाही. मोठमोठ्या विद्वानांना हि या प्रश्नाचे उत्तर विचारून पाहिले पण
त्यानाही यातील कुट शोधता आले नाही. राजपुरोहिताने विचाराची दिशा सोडून
दिली, आता फक्त मृत्यूचा विचार तो करत होता. मृत्युच्या भीतीने त्याने नगर
सोडून दिले, गावाबाहेर चालत राहिला, चालून चालून थकला तेंव्हा एका
झोपडीपाशी जावून बसला. योगायोगाने ती झोपडी त्या पंडिताची होती आणि तो
आपल्या पत्नीशी बोलत होता. पंडित बायकोला प्रश्नाचे उत्तर सांगत
होता,"माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने राजपुरोहित मरणार हे खरे !
अगं ! पंधरा तिथीमध्ये पाच तिथी अशा असतात कि त्यांच्या पुढे 'मी' प्रत्यय
लागतो पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी तसेच पाच तिथी अशा असतात
ज्यामध्ये 'शी' प्रत्यय लागतो एकादशी,द्वादशी,त्रयोदशी,चतुर्दशी आणि
पुर्णमाशी आणि पाच तिथीमध्ये मीही लागत नाही आणि शी हा प्रत्यय लागत नाही
प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि षष्ठी. बघ हे उत्तर राजपुरोहीताला
कधीच येणार नाही." हे बाहेरून पुरोहिताने ऐकले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात
उत्तर दिले व स्वतचा जीव वाचविला. अहंकारी पंडिताला राजाने दंड केला.
तात्पर्य :- दुसऱ्याला कधीही कमी लेखू नये कारण आपण या ना त्या प्रकारे त्या अवस्थेत जावू शकतो.
अनुभवाच्या जोरावर यश
एका व्यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय
घेतला. त्याच्या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्यापारी
म्हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्याने अडचण निर्माण होईल एक तर तू
पहिल्यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्यापा-याने विचार केला, आपण
पहिल्यांदा जाण्यात फायदा आहे, रस्त्याने सरळ गेलो तर बैलांना
चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्या किंमतीवर सामान विकेन. त्याने
पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या व्यापा-याला वाटले, या
व्यापा-याच्या जाण्याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत
खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्या खोदलेल्या
विहीरीचे पाणी प्यायला मिळेल. शिवाय चांगल्या किंमतीवर सौदा करता येईल.
दुस-या व्यापा-याच्या माणसांनी पाण्याने भरलेल्या घागरी बरोबर घेतल्या
आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्यांना भेटले,
त्या लोकांनी व्यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन
जाण्याची गरज नाही. व्यापा-याने त्यांचा सल्ला ऐकला. त्या रात्रीच
त्या व्यापा-याचा काफिला लुटला गेला. व्यापारीही मारला गेला.एक
महिन्याने पहिला व्यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्हा दरोडेखोराच्या
माणसांनी त्यालाही खोटे बोलून भुलविण्याचा प्रयत्न केला पण पहिला
व्यापारी त्यांच्या बोलण्याला भुलला नाही. व्यापा-याच्या माणसांनी
दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्यापा-याला विचारले असता व्यापारी
म्हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी
डोक्यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्यापारी पुढे गेला व
त्याच्या धंद्यात अशा छोट्याशा गोष्टींमुळे तो यशस्वी झाला.
तात्पर्य:- अनुभवाने माणूस यशस्वी होतो.
दुहीचे फळ
एक
शिका-याने पक्षयांना पकडण्यासाठी एक जाळे पसरविले. त्यात दोन पक्षी
अडकले. परंतु त्यांनी परस्पर विचार करून ताबडतोब त्या जाळ्यासकट उडण्यास
सुरवात केली.
शिका-याला ते पाहून दुःख झाले; तरीही तो जमिनीवरून पक्षयांकडे पाहत
त्या दिशेने पळत सुटला. एका माणसाने बसल्या बसल्या हे दृश्य पहिले.
त्याने शिका-याला जवळ बोलावून विचारले. "तू विनाकारण का पळत आहेस? पक्षी तर जाळे घेऊन आकाशात उडत आहे."
शिकारी म्हणाला, " आता या पक्षामध्ये मित्रता आहे. परस्पर मेळ साधून ते
एकाच दिशेने उडत आहेत. म्हणूनच ते माझे जाळे पळवू शकले; परंतु थोड्या
वेळाने त्यांच्यात भांडण किंवा कुरबुर होऊ शकते. मी त्यांच्या मागे या
अपेक्षेने धावत आहे.
जेव्हा एकमेकांशी भांडण केल्यामुळे जाळे व ते खाली पडतील त्यावेळेस मी त्यांना पकडीन".
शिकारी म्हणाला, ते खरे ठरले थोड्या वेळाने ते पक्षी दमले. तेव्हा
आपण कुठे उतरायचे यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाला. सामंजस्य नाहीसे
झाल्यामुळे उडण्याची दिशा व पंखांची गती सारखी राहिली नाही.
त्यामुळे ते जाळे सांभाळू शकले नाहीत. जाळ्याच्या भाराने अडकत ते पण
खाली पडावयास लागले व जाळ्यात अडकले. त्यांचे पंखदेखील गुरफटले गेले.
परिणामतः जाळ्यासकट ते जमिनीवर पडले.
शिका-याने त्यांना सहज पकडले.
तात्पर्य :- एकीत बळ असते. दुहीने आपला नाश होतो.
प्रामाणिक मुलगा
एक
मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या
आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो
वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी
बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर
निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची
सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने
त्यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने
शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्याशेजारी
सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात
हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला,
शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग
तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस'' मुलगा म्हणाला,'' इथेच
कोणीच नव्हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले
नसते, कोणीच मला पाहात नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वत:ला ते
पाहात होतो. परंतु मी स्वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्याच्या या
बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला,'' आपण
करतो ते आपला आत्मा पाहात असतो, आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही.
दुस-याला लाख फसवू पण स्वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच
तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल.''
तात्पर्य
:- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले
भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत
नाही पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची
निघाल्यास त्याचा दोष आईवडीलांना येतो.
एकीचे बळ
मालकानं बैलासमोर गव्हाणीत पेंडीचा पीळ मोकळा केला तसा रवंथ करत
बसलेला बैल उठून उभा राहिला, मालक गोठ्याच्या बाहेर गेल्याची खात्री करून
बकरं आत शिरलं.. आडव्या मेढीवर गोठ्यात 'तपश्चर्या' करत बसलेलं कोंबडं उडी
मारून गव्हाणीत येऊन बसलं.. इकडेतिकडे पहात एक उंदीर गव्हाणीत येऊन बसला अन
रोजची 'गोलमेज परिषद' सुरू झाली... सुखदुःखाच्या गप्पा मारत-मारत.. बैल
कडब्याच्या पेंडीतली चिपाडं, पान-पान शोधून बकरं, एखाददुसरे राहिलेले कणीस
शोधत कोंबडं तर गव्हाणीत पडलेले ज्वारीचे दाणे अन सुग्रासवर उंदीर ताव
मारण्यात दंग झाले..! अगदी दृष्ट लागावी अशी एकी...चौघेही आनंदात जगत होते...
चारही
जण जिवलग मित्र, वेगवेगळ्या संवर्गात असले तरी शेवटी सर्व प्राणीच...!
एकमेकांच्या सुखदुःखाचे साक्षीदार ! नास्ता,लंच अन डिनर एकत्र करणारे अन
मालकाच्या सदैव चाकरीत असणारे, प्रामाणिक असणारे...!!
सकाळची न्याहरी आटोपली अन उंदीर आपल्या नित्यनियमाप्रमाणे घराची परिक्रमा करायला निघाला...! मित्रांच्या संगतीमुळे मालकाला त्रास होईल असे तो अजिबात वागत नव्हता..! पण त्याला आज अचानक एक धक्का बसला.. थरथर कापू लागला.. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला....'अहो..
एक उंदीर रोज दिसतोय हो.. कुठं काही नुकसान नाही पण त्याचा वेळीच बंदोबस्त
करा !' ओसरीत पेपर वाचत बसलेल्या मालकाच्या हातात चहाचा कप टेकवत मालकीण
बोलल्या...!
'अगं व्हय की, म्या पण त्याला पाहिलंय.. आज बाजारातून येतांना पिंजरा घेऊन येतो..!'
उंदीर भेदरलं... परिक्रमा विसरलं... अन थेट गोठ्यात मित्रांकडे धाव घेतली...
गोठ्यात फक्त कोंबडं होतं, ' दादा..दादा.. !'
'काय झालं रे ? एवढी धाप का लागली ? एखादा बोक्या लागला का पाठी ??' कोंबडं हसतच बोललं.
'नाय पण मालक माझ्यासाठी पिंजरा आणणार हाय म्हण.… त्यांच्या तोंडून ऐकून आलोय !' उंदीर आवंढा गिळत बोललं.
'मग ??' कोंबडं.
'भाऊ मला वाचवा !' आर्त स्वरात उंदीर बोलत होतं.
'नाय बा, पिंजरा तुझ्यासाठी आहे अन 'समस्या' पण तुझीच आहे... तुझी तू निपट !' कोंबडं अंग झटकत बोललं !
पडलेल्या चेहऱ्यानीशी उंदीर आपली 'समस्या' घेऊन गोठ्याबाहेर चरत असलेल्या बकऱ्याकडे गेला..!
बकऱ्याने सर्व हकीकत गंभीरपणे ऐकून घेतली.. अन गालातल्या गालात हसला..
'लावू
दे मालकाला पिंजरा.. त्याने काय होतंय ? तू फक्त पिंजऱ्यात जाऊ नको !
चिल्लर गोष्टींसाठी माझा वेळ खाऊ नको..! तुझे कोडे तूच सोडव.. पुन्हा त्रास
देऊ नको ..!!'
खाडकन
तोंडात चपराक बसल्यावर जसा चेहरा होतो तसा चेहरा घेऊन तो शेतात चरत
असलेल्या अनुभवी वयस्कर बैलाच्या दिशेने आपल्या सर्व आशा, आकांक्षा अन
अपेक्षा घेऊन धावला...!
बैलाने त्याची सर्व 'समस्या' ऐकली.. समस्या ऐकेपर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला....
'त्याचं
कसं आहे उंदीर भाऊ, मी आहे पाळीव, अन त्यात 'मालकाच्या दावणीला'
बांधलेला..! तुला मदत करण्याची माझी प्रचंड इच्छा आहे पण.... थोडंस अवघड
वाटतंय..! तसं मी मालकाला बोलून बघतो... तू उद्या भेट..!' बैलाची ही
प्रतिक्रिया ऐकून त्याचा मैत्रीवरचा विश्वासच उठला...!!
सायंकाळ झाली..
मालक
गोठ्यात शिरले... मालकीण मागेच होती...मालकाच्या हातात 'उंदराचा पिंजरा
होता!' मालकीनीच्या सांगण्यावरून त्याने तो दगडाच्या पवळीला असलेल्या
भगदाडाजवळ लावला.. उंदराची जाय - यायची वाट तीच तर होती...
पिंजरा लावून मालक मालकीण निघून गेले.
उंदराने गव्हाणीच्या साक्षीने सर्वसमोर एक आर्त मागणी केली...
--
'तुम्ही सर्व माझे आधारस्तंभ आहात, माझं भवितव्य तुमच्या हातात आहे... मी
तुमच्यापैकी एक आहे.. आज संकट माझ्यावर ओढवलंय उद्या तुमच्यावर ओढवेल कृपया
मदत करा, मला वाचवा !' तो मनातून विनंती करत होता...!
पण सर्वजण त्याला हेतुपुरस्कर टाळत होते ..!
"दोस्त दोस्त ना रहा....!!" गाणे बॅकग्राऊंड ला वाजत होते...!
हताश अन निराश होऊन उंदीर निघाला...!
पवळीच्या
भगदाड जवळ लावलेल्या पिंजऱ्याकडे हताश नजरेने पहात अन कालपर्यंत 'संघटनेत,
एकीत अन समूहात असणाऱ्या बळाबद्दल चर्चा करणाऱ्यांनी 'समस्या तुझी-अन-उपाय
तूच शोध !' असा उपदेश करत अनेक दिवसाची मैत्री क्षणात तोडली होती..!!
दावणीतले 'पाळीव' अन हा 'उपरा' असे दोन भाग स्पष्ट झाले होते...!! उंदराने
जागा बदलली, मेढीवर तुराट्याच्या काड्यावर गवत अंथरून तिथे तो झोपू लागला..
तशी पडण्याची भीती होती पण पिंजऱ्यात अडकून मरण्यापेक्षा हे बरं ... !
रात्र
झाली होती.... अचानक गोठ्यातून खडखड असा आवाज येत असल्याने मालकीणबाई
आल्या.. 'नक्की पिंजऱ्यात उंदीर अडकला असेल...' गोठ्यात आल्या.. थोडासा
अंधार असल्याने दिसत होते... अंदाज बांधत सकाळी ठेवलेल्या पिंजऱ्याच्या
दिशेने पुढे सरकल्या... जिकडे हालचाल जाणवत होती तिकडे पिंजरा थोडासा
अस्पष्ट दिसला म्हणून तिने तो पिंजरा उचलला.... अन तितक्यात तिला काहीतरी
चावल्याची जाणीव झाली म्हणून तिने पिंजरा फेकून दिला..!पिंजऱ्यात अर्धवट आत
अन अर्धवट बाहेर अशा अवस्थेत 'विषारी साप' अडकला होता !! मालकीण
दवाखान्यात शरीक झाली... मालकाने तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
केले... खूप पैसा लावला...काही दिवस निघून गेले... मालकीण दवाखान्यात अन
मालक दिवाळखोर...!
एक
दिवस मालक गोठ्यात शिरला.. त्याच्या मागोमाग एक माणूस... मालकाने
कोंबड्याला आवाज दिला अन पकडले अन सोबत आलेल्या माणसाशी सौदा करून त्याच्या
हवाली केले... अत्यंत हताश नजरेने मित्रांकडे पाहत जीवाचा आकांडतांडव करत
कोंबड्याने मित्रांचा निरोप घेतला..! उंदीर सर्व वर बसून पहात होता..
चार
दिवस उलटले....पुन्हा मालक अन तोच माणूस गोठ्यात शिरले.... बकऱ्याच्या
पाठीवर त्याने हात फिरवला तसं बकरं थरारलं... त्याला घाम फुटला... उजव्या
हाताने त्याने बकऱ्याच्या पोटाजवळच्या फासळीत दाबले अन मालकाशी बोलून सौदा
पूर्ण केला.. मालकाच्या हातावर पैसे टेकवत बकऱ्याला सोबत घेऊन निघाला....
बकऱ्याच्या आकांताबरोबरच बैलाच्या डोळ्यातून दोन अश्रू टपकले....
पुन्हा
आठ दिवस निघून गेली...मालक गोठ्यात शिरले ... आज त्यांच्या बरोबर दोन
माणसे लुंगी, बनियन अन टोपी परिधान करून होती..गोठ्यात बैलाशिवाय कोणीच
नव्हते.. तो शहारला... थरथरू लागला... त्याचाही सौदा झाला अन तो ही जड
पावलांनी गोठ्याबाहेर पडला....मेढीवरून पाहणाऱ्या उंदराच्या डोळ्यात अश्रू
तरळले...!
जिच्या इलाजासाठी सर्व गोठा रिकामा झाला ती मालकीण पण वाचली नाही...!
जे कालपर्यंत म्हणत होते की, 'ही समस्या आमची नाही... तुझी समस्या
आहे अन तू उपाय पहा..!' नेमके तेच आज त्या समस्येचे 'योग्य वेळी' निराकरण न
केल्याने 'साफ' झाले होते... अन 'समस्या' ज्याची होती, तो आज आपल्या अढळ
ठिकाणी विराजमान होता..!
वेळीच " कोंबडा अन बैलाच्या आवाजाच्या गजरात बैलाने पिंजऱ्यावर
आपल्या दमदार खुरांचा पाय ठेवून पिंजरा मोडला असता तर 'मैत्री' पण अबाधित
राहिली असती अन 'स्वतःचे अस्तित्व पण !' ..."*
समस्या लहान भावाची असो, मोठ्या भावाची असो, बहिणींची असो वा
सर्वसमावेशक असो ... समस्या कोणाची का असेना ... आज त्या समस्यात तो
गुरफटलाय... उद्या आपण गुरफटू नये म्हणून 'कितीही छोटी.. कदाचित आपली नसली
तरी.. त्यांना साथ द्या ! त्यांना जगवा अन स्वतः दुसऱ्यांसाठी जगा !!'
"स्वतःसाठी जगणे.. मरणासम आहे !!"
तात्पर्य
:- कदाचित आपली अवस्था वरील कथेप्रमाणे होऊ नये....म्हणून सर्वांनी
एकमेकांना अडचणीच्या काळात निस्वार्थ मदत केली पाहिजे !! एकीतच बळ आहे.
संघटन हेच खरं फळ आहे.
जंगल चा राजा
एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे
वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो
म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा
त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित
पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर
हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.'
तात्पर्य - आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे
असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.
चूकांची सुधारणा
एका गावामधे चित्रकार होता. त्यानं एक मोठं चित्र काढलं. मोठं पोस्टरच होतं
ते. ते गावातल्या एका प्रमुख चौकात ठेवलं. तिथं एक सूचना लिहिली, या
चित्रात बघणाऱ्याला काही चूक आढळल्यास सोबतच्या वहीत ती लिहावी. पुष्कळ लोक
आले. चित्र बघून त्यांनी हवी ती सूचना लिहिली. वही अगदी भरून गेली. एका
चित्रात इतक्या चुका, कसं शक्य आहे ते? तो पुरता गोंधळून गेला.
आपली शंका दूर करण्यासाठी तो आपल्या गुरुकडे गेला. झालेला प्रकार त्याने आपल्या गुरुच्या कानी घातला. त्यावर गुरुने सांगितले, आता असे कर, ते चित्र पुुन्हा चौकात ठेव. त्याच्या शेजारी रंग व ब्रश ठेव आणि सूचना लिही की, "ज्याला कोणाला या चित्रात चूक दिसेल, दोष दिसेल त्याने तो ब्रशने दुरुस्त करावा.'
चित्र सुधारण्यासाठी एकही माणूस पुढे आला नाही. ते चित्र आहे तसेच राहिले. आमच्या समाजाला दुसऱ्याच्या चुका तेवढ्या दिसतात. दोष दिसतात पण त्या सुधारण्यासाठी कोणी पुढे येत नाही ही आमच्या समाजाची जी प्रवृत्ती आहे ती बदलली पाहिजे आणि त्यासाठी मी काय करतोय हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.
आपली शंका दूर करण्यासाठी तो आपल्या गुरुकडे गेला. झालेला प्रकार त्याने आपल्या गुरुच्या कानी घातला. त्यावर गुरुने सांगितले, आता असे कर, ते चित्र पुुन्हा चौकात ठेव. त्याच्या शेजारी रंग व ब्रश ठेव आणि सूचना लिही की, "ज्याला कोणाला या चित्रात चूक दिसेल, दोष दिसेल त्याने तो ब्रशने दुरुस्त करावा.'
चित्र सुधारण्यासाठी एकही माणूस पुढे आला नाही. ते चित्र आहे तसेच राहिले. आमच्या समाजाला दुसऱ्याच्या चुका तेवढ्या दिसतात. दोष दिसतात पण त्या सुधारण्यासाठी कोणी पुढे येत नाही ही आमच्या समाजाची जी प्रवृत्ती आहे ती बदलली पाहिजे आणि त्यासाठी मी काय करतोय हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.
अप्रसिद्ध संत
‘गाढीपूर’मधे ‘पवहारी’
नांवाचे एक योगी राहात होते.
ते वेगवेगळे चमत्कार
करून दाखवीत. परंतु
त्यांच्याविषयी कोणाला फारशी
माहिती नव्हती. फक्त
त्यांच्या झोपडीवजा छोट्याश्या घराच्या
आसपासचे लोक त्यांना
एक अत्यंत कनवाळू,
दयाळू व्यक्ती म्हणून
ओळखायचे. ज्या व्यक्तीने
अध्यात्म, धर्म या
गोष्टींवर साधा विचारही
केलेला नाही, तिच्या
मनांत परमेश्वराविषयी अपार
प्रेमभावना जागृत करण्याची
ताकद योगींच्या आशीर्वादामधे
होती.
स्वामी विवेकानंदांना (1863-1902) ह्या योगींबद्दल
खूप आदर होता.
स्वामीजी एकदा गाझीपूरला
आले असताना त्यांच्या
ऐकण्यांत आलं कीं
एकदा एक घरफोड्या
मध्यरात्री योगींच्या झोपडींत घुसला.
झोपडीत तेवणार्या
पणतीच्या मिणमिणत्या प्रकाशात तो
किंमती वस्तू शोधूं
लागला. तिथे फारसे
कांही त्याच्या हाताला
लागले नाही. परंतु
एका ताटलीत योगींच्या
भक्तांनी दिलेली कांही
नाणी आणि नेहमीच्या
वापराची किरकोळ भांडी
त्याला सांपडली. चोराने
ती नाणी आणि
भांडी आपल्या पिशवीत
घातली आणि तो पिशवीला गांठ मारणार
इतक्यांत ते सगळे
सामान खाली पडले
व त्याचा मोठा
आवाज झाला.
योगी निद्रावस्थेत होते कीं
ध्यानावस्थेत होते, देव
जाणे! परंतु त्या
आवाजाने त्यांना जाग
आली आणि त्यांनी
शांतपणे विचारले, ‘‘अरे
नारायणा! काय झाले?’’
चोराला वाटले होते
कीं झोपडीमध्ये योगी
एकटेच आहेत. परंतु
योगींच्या प्रश्नावरून त्याच्या लक्षांत
आले कीं झोपडीत
‘नारायण’ नांवाची आणखी एक व्यक्तीही आहे. त्याच्या
मनांत आले, ‘‘न
जाणो, ‘नारायण’ ही
कदाचित आपल्या या
गुरूंचे रक्षण करणारी
एखादी बलदंड व्यक्तीही
असूं शकते.’’ तो
खूप घाबरला आणि
चोरीच्या मालाने भरलेली
आपली पिशवी न उचलताच तिथून
पळाला. पण त्याच्या
मागोमाग येणार्या
कोणा व्यक्तीच्या पावलांचा
आवाज त्याला ऐकूं
आला. अर्थातच, नारायण
त्याचा पाठलाग करत
होता आणि त्याने
धरताक्षणीच चोर नारायणाच्या
आधीनच झाला. तो
जोरात पळायच्या प्रयत्नांत
होता, पण अचानक
पाठीमागून आलेल्या हाताने त्याच्या
खांद्याची घट्ट पकड
घेतली.
‘‘अरे नारायणा, तुला इतकी
कसली घाई झाली
आहे, की गोळा केलेल्या वस्तूच तू
बरोबर घ्यायच्या विसरलास?’’
असे म्हणत योगी
चोरीचा माल घरफोड्याने
बरोबर न्यावा म्हणून
त्याची विनवणी करूं
लागले. चोराला कळून
चुकले की योगींना
सगळ्यांच्यात नारायण म्हणजे
साक्षात् परमेश्वर दिसतो आहे.
योगींना स्वतःला कसलीच
अभिलाषा नाही. त्यामुळेच,
त्यांच्या दृष्टीने खरे तर निरूपयोगी असणार्या
वस्तूंमुळे घरफोड्याला मिळणारा आनंद
त्यांच्यासाठी जास्त महत्वाचा
होता.
त्यानंतर लोकांना इतकीच माहिती
होती कीं घरफोड्याने
योगींना वाकून नमस्कार
केला आणि लगेच
तो तिथून पळून
गेला. कांही वर्षानंतर
हिमालयाच्या पर्वतराजीतून प्रवास करताना
स्वामी विवेकानंदांना एक
ज्ञानी पुरुष भेटला.
तो अत्यंत तेजस्वी
होताच, परंतु त्याला
सखोल अध्यात्मिक ज्ञान
असलेले सहजपणे समजून
येत होते. आणि
ही व्यक्ती म्हणजे
दुसरी-तिसरी कोणी
नसून पवहारी बाबांच्या
घरी चोरी करायला
गेलेला घरफोड्याच होता.
हे जेव्हां त्याच्या
बोलण्यातून कळलं, तेव्हां
स्वामी विवेकानंदांना आश्चर्याचा
सुखद धक्का बसला.
योगींच्या आत्यंतिक प्रेमळ स्पर्शाने
आणि ‘नारायण’ असं
संबोधण्याने घरफोड्याला जणूं आपला
पुनर्जन्म झाल्यासारखेच वाटले. तोपर्यंत तो जगलेलं
पापी आयुष्य क्षणार्धात
भूतकाळांत जमा झाल्याचे
त्याला जाणवले. आपल्यासारख्या
पापी मनुष्याचे एकदम स्वरूपच
बदलून टाकण्याची योगींजवळ
एकवटलेली ताकद पाहून
त्या ताकदीविषयी जाणून
घेण्याची उत्कंठा त्याच्यात निर्माण
झाली. योगींच्या घरी
किरकोळ लूटमार करायला
गेलो आणि एक महत्वपूर्ण, अमर्याद संपत्तीचा
खजिनाच आपल्याला गवसला
आहे, याची आश्चर्यकारक
जाणीव घरफोड्याला झाली.
स्वामी विवेकानंदही चांगलेच
आश्चर्यचकित झाले होते. त्यांना
वाटले कीं खरोखरीच संतांची
वचने अशा लोकांच्यात दडून
राहिलेली असतात, आणि त्यांच्या
रूपानेच जिवंत रहातात.
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत
सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका
काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा
असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर
मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच
वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला.
तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात
उरली नव्हती.
तात्पर्य- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.
तात्पर्य- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.
कर्म
एक वयस्कर साधू महाराज पावसात देवाचे नाव घेत घेत आनंदाने भिजत चालले
होते. समोरच एका मिठाईच्या दुकानात कढईमध्ये गरम दूध उकळत होते आणि बाजूला
गरमागरम ताजी जिलेबी तळली जात होती. हे बघून आपसूकच साधूचे पाय काही वेळ
त्या दुकानासमोर थांबले. बहुदा पोटातील भूक तसे करायला सांगत होती. इच्छा
खूप होती, पण काय करणार, शरीराला पोट होते, पण अंगावरील कपड्याला खिसाच
नव्हता. साधूकडे एक रुपयाही नव्हता.
बहुधा दुकानदाराला
ह्याची जाणीव झाली असावी. त्या सदहृदयी दुकानदाराने आदराने साधूला जवळ
बोलावले आणि एक ग्लास भरून गरमागरम दूध आणि एक प्लेट गरमागरम जिलेबी वाढली.
साधूने मोठ्या आनंदाने दूध आणि जिलेबी खाल्ली आणि दुकानदाराला धन्यवाद
देऊन मोठ्या भक्तीने आकाशाकडे बघितले आणि ईश्वराचे आभार मानले आणि
दुकानातून प्रस्थान केले.
पोट भरल्याने
साधूचे मन प्रफुल्लित झाले होते आणि जगाची फिकीर न बाळगता त्याने रस्त्यावर
देवाचे भजन गायला आणि नाचायला सुरू केले....
समोरून एक
नवविवाहित जोडपे येत होते आणि इकडे साधू नाचत असताना साधुचा पाय
रस्त्यावरील डबक्यात पडला ज्यात चिखलाचे पाणी होते आणि ते चिखलयुक्त पाणी
त्या जोडीतील तरुण बाईच्या अंगावर उडाले. तिची साडी, दागिने सर्व घाण
झाले. हे बघून त्या बाईच्या नवऱ्याला भयंकर राग आला आणि साधूला म्हणाला,
"म्हाताऱ्या तुला डोळे दिले नाहीत का ? माझ्या बायकोच्या अंगावर चिखल
उडवायची तुझी हिम्मत काशी झाली..!" त्याला भयंकर राग आला आणि तो साधूच्या
अंगावर धावून गेला. आजूबाजूला लोक हा प्रकार बघत होते पण कोणी काही बोलले
नाही. त्याच्या बायकोने त्याला आवरायचा प्रयत्न केला पण त्याच्या डोळ्यातील
राग बघून मागे सरकली. त्या युवकाने पुढचा काही विचार न करता साधूच्या
मुस्काटीत एक जोरात ठेऊन दिली. बिचारा साधू तोल जाऊन त्या खड्ड्यात पडला,
त्याला खड्ड्यात पडलेला बघून तो युवक हसला आणि बायकोचा हात धरून चालू
लागला......!!
इकडे साधूला काहीच
कळले नाही. त्याने फक्त वरती आकाशाकडे बघितले आणि ईश्वराला म्हणाला, "वा
ईश्वरा तुझी लीला अगाध आहे. एका क्षणाला गरमागरम दूध आणि जिलेबी देतो आणि
दुसऱ्या क्षणाला कानाखाली झापड, पण असो तू जे काही मला देतोस ते मला पसंद
आहे.......!!
इकडे ते नवविवाहित
जोडपे त्यांच्या रस्त्याच्या पलीकडे असलेल्या घरी पोचले. बायकोशी हसत हसत
गप्पा मारत नवरा वरच्या मजल्यावर दरवाजा उघडायला निघाला. पाऊस पडल्याने
जिना ओला झाला होता आणि त्या युवकाचा पाय घसरला. हे बघून ती बाई जोरजोरात
ओरडू लागली आणि लोकांना मदतीला बोलवायला लागली. लोक मदतीला आले पण उशीर
झाला होता.जोरात आपटल्याने त्या युवकाचे डोके फुटले होते आणि त्याचा जागीच
मृत्यू झाला होता.
साधू समोरुनच चालले
होते. त्यांना बघून लोक कुजबुज लागले की नक्कीच ह्या साधूने त्याला शाप
दिला असणार. म्हणून ह्या युवकाचा मृत्यू झाला, ही कुजबुज ऐकून काही
मस्तीखोर युवकांनी साधूला घेरले आणि म्हणाले, "तुम्ही कसले ईश्वराचे भक्त
आहात? ज्यांनी फक्त एक थोबाडीत मारली म्हणून असला भयंकर शाप दिलात!
इश्वराचे भक्त तर दयाळू असतात, असे भयंकर तुम्ही कसे केलेत......?"
हे ऐकल्यावर साधूने सांगितले की, "ईश्वराशपथ मी त्या युवकाला शाप दिला नाही.......!!"
"जर तुम्ही शाप दिला नाही तर मग ह्या युवकाचा अकाली मृत्यू कसा झाला ?", एका व्यक्तीने विचारले.
हे ऐकून साधूने
जमलेल्या गर्दीला विचारले की "जे काही घडले त्या संपूर्ण प्रसंगाचे कोणी
प्रत्यक्ष दर्शक आहेत का...!" , हे ऐकून एक व्यक्ती पुढे झाली आणि म्हणाली,
की "हो जे काही घडले त्याचा मी प्रत्यक्ष दर्शी आहे."
साधू म्हणाला,
"माझ्या पायाने जो चिखल उडाला तो ह्या युवकाच्या अंगावर उडाला होता का ?"
व्यक्ती म्हणाली "नाही, मात्र तो चिखल त्या बाईच्या अंगावर जरूर उडाला
होता..."
मग साधूने विचारले, "जर युवकाच्या अंगावर चिखल उडाला नव्हता तर मग त्याने मला का मारले ?"
व्यक्ती म्हणाली,
"तो युवक या महिलेचा नवरा म्हणजे प्रेमी होता आणि महिलेच्या अंगावर चिखल
उडालेले त्याला सहन झाले नाही म्हणून त्याने तुम्हाला मारले...."
हे
सर्व ऐकून साधू मोठ्याने हसला आणि म्हणाला,"ईश्वराशपथ मी ह्या युवकाला शाप
दिला नाही पण नक्की ईश्वराचे माझ्यावर प्रेम आहे. ह्या बाईचा प्रेमी सहन
करू शकला नाही तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या ईश्वराला हे सहन कसे होईल की
कोणी मला मारावे..! ईश्वर एवढा शक्तिशाली आहे की जगातील मोठ्यात मोठा
चक्रवर्ती सम्राट पण ईश्वराच्या कोपाला घाबरतो.... ईश्वराची लाठी दिसत तर
नाही पण जेव्हा पडते तेंव्हा मोठा आघात करते आणि त्या माराची तीव्रता फक्त
आपले चांगले कर्मच कमी करू शकतात. म्हणून चांगले कर्म करावे....."" हे सांगून साधू तेथून निघून गेला.
तात्पर्य :- "कुणाचे चांगले करता आले नाही तरी चालेल, शांत रहा. पण कुणाचे वाईट करण्याचा, बदनामी करण्याचा विचारही करू नका.
अपमान आणि उपकार
तात्पर्य :-"माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."
मैत्री दोन वाघाची
एका जंगलात दोन वाघ असतात. दोघेजण अगदी जवळचे मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-कानून समजवून घेतले, एकत्र शिकार केली...एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होते आणि दोघे वेगळे होतात.
बरीच वर्षे जातात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो तर काही कुत्र्यांनी त्या वाघाच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो...
दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?".
वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण बळ येईल"
तात्पर्य :-"फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू.. जेणेकरून कुत्र्यांना पण बळ येईल."
ज्याचे त्याचे संस्कार
ReplyDelete« on: November 17, 2015, 02:46:59 PM »
-महावीर सांगलीकर
एक हत्तीण आणि तिचं पिल्लू एका गल्लीतनं चालले असताना त्या गल्लीतलं एक कुत्रं पाठीमागून त्यांच्यावर भुंकायला लागलं. याचा हत्तीणीच्या पिल्लाला राग आला आणि ते मागे वळून त्या कुत्र्यावर धावून जायला लागलं. हत्तीणीनं आपल्या सोंडेनं पिल्लाचं शेपूट धरून ओढलं आणि त्याला म्हणाली, ‘बाळा, कुत्र्यांच्याकडे कधी लक्ष देऊ नये. आपण आपल्या वाटेनं चालत राहावं. तसाही कुत्र्यांच्या भुंकण्याचा आपल्याला फायदाच होतो. लोकांचं लक्ष कुत्र्याकडे नाही तर आपल्याकडे जातं’
कुत्रा भुंकत असताना त्याचं पिल्लू मात्र खेळत-बागडत होतं. कुत्र्याला आपल्या पिल्लाचा राग आला. ते त्याच्यावर भुंकत म्हणालं, ‘अरे कार्ट्या, आपल्या गल्लीत एवढे मोठे हत्ती शिरलेत आणि तू खेळत काय बसला आहेस? तुला कांही कळतं की नाही? आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्यावर आणि आपल्याच लोकांच्यावरदेखील भुंकायचं असतं नेहमी, लक्षात ठेव. भुंकायला शिक, नाहीतर तुला कुत्रं सुद्धा विचारणार नाही!’
एकदा एक खेकडा समुद्र किनाऱ्यावर खेळत होता. त्याच्या तीरप्या चालीने वाळूवर काही रेखाटत होता. समुद्राच्या लाटा किनाऱ्याला धडकत होत्या आणि त्याने मागे सोडलेले त्याचे पदचिन्ह पुसत होत्या.
ReplyDeleteत्या खेकड्याने त्या लाटांना विचारले, "आपण तर मित्र आहोत मग सांग बरे तु असे का केले ? मी मेहनतीने इतकी सुंदर नकाशी केली तु मात्र क्षणात येवून ती पुसली! " हे ऐकून लाट काहीशी मागे सरकली मग क्षणभर थांबून त्याला उत्तरली तु मेहनतीने सुंदर नकाशी काढली. मी मात्र ती क्षणात निर्दयीपणे पुसली कारण या किनार्यावर एक कोळी फिरत आहे काही सावज मिळते का हे शोधत आहे. जर त्याला तुझ्या पायाचे चिन्ह दिसले असते तर त्याने तुला सहज शोधले असते. खरचं माला तुला दुखवायचे नव्हते रे, मला तुला कायमचे गमवायचे हि नव्हते. हे ऐकून त्याला त्याची चूक उमगली क्षणाचाही वेळ न दडवता त्याने लाटेची माफी मागीतली.
यालाचं कदाचित खरी मैत्री म्हणातात.
सारे जिवलग मित्र एकमेकांवर असेचं प्रेम करतात.
- See more at: http://marathibodhkatha.blogspot.in/2013/07/khekda-samudrachi-maitri.html#sthash.W4jlGFUW.dpuf
एक २४ वर्षाचा तरुण मुलगा आणि त्याचे वडील ट्रेन ने जात असतात. त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं जोडप बसलेल असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो, "बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत." त्याचे बाबा त्याच्याकडे पाहून कौतुकाने हसतात.
ReplyDeleteत्यांच्या समोर बसलेल्या जोडप्याला ला ते पाहून नवल वाटत. हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ओरडतो. "बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत." तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो. ”तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का दाखवत नाही.?"
वडील हसतात आणि म्हणतात, "आम्ही आत्ताच डॉक्टरांकडूनच आलो आहोत, माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”
कुठलाही निर्णय घाईत घेवू नका. सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते.
- See more at: http://marathibodhkatha.blogspot.in/2011/10/blog-post.html#sthash.oMwyXoiD.dpuf
एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला....
ReplyDeleteत्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले...
महिने लोटले... वर्षे सरली....
पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला....
आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही....
तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...
कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...
तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....
तर कधी प्रेयसीच्या नात्याने.....
कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो...
आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो......
आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात .......
- See more at: http://marathibodhkatha.blogspot.in/2011/03/blog-post_08.html#sthash.WXnkp3M7.dpuf
एकदा एक अनुभवी आणि वृध्द गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले.
ReplyDeleteतो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुखी तरूणाला त्यातील मूठभर मीठ एका एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगीतले.
’पाणी चवीला कसे लागले ?‘ गुरूंनी विचारले.
‘कडु’ असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले.
गुरूंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मुठभर मीठ त्या तळयात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळयाजवळ आले.
शिष्याने मूठभर मीठ त्या तळयात मिसळल्यानंतर ते वृध्द गुरू म्हणाले, ‘आता या तळयातील पाणी पिऊन पहा.‘
त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यावर गुरूंनी त्याला विचारलं, आता यापाण्याची चव कशी आहे ?‘
‘ताजी आणि मधुर !‘ शिष्याने सांगितले.
‘आता तुला मिठाची चव लागतेय ?‘
‘नाही‘.
गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात आतात घेतला. ते म्हणाले, ‘आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते. आयुष्यातील दुखही तेवढच असतं, परंतु आपण ते दुख कशात मिसळतो यावर त्याचा कडवटपणा अवलंबुन असतो. म्हणून जेव्हा आापण दुखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो. ती म्हणजे, आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजेत. पेला होणं थांबवून तळं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.‘
तात्पर्यः नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.
- See more at: http://marathibodhkatha.blogspot.in/2011/08/blog-post.html#sthash.pMMNKOJ1.dpuf
एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,
ReplyDeleteमुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ?
फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.
मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.
फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे.
मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन.
फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात).
तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर...
मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद
दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ?
मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते.
तात्पर्य :-
१) आमीर खान, राहुल द्रविड हे जन्मापासून परफेक्ट नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून, मेहनत करून ते परफेक्ट झाले.
२) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत राहिल्यास, प्रेमाच फुल कधीच कोमजणार नाही.
३) भारत देश असा, भारत देश तसा, ह्या भारताचे काहीच होणार नाही, असं म्हणत बसण्यापेक्षा, आपण भारतीय संस्कृती व भारताच्या सिद्धांताप्रमाणे खरोखर वागतो कि नाही, वआपण भारतासाठी काय करू शकतो हे पाहणे जास्त जरुरीच आहे.
- See more at: http://marathibodhkatha.blogspot.in/2013/04/perfect.html#sthash.UazWekgZ.dpuf
एका सरळसोट, अरुंद डोंगरातून जाणारी पायवाट होती. दुपारी १२ वाजले होते. रणरणत्या उन्हान बेजार केल होत. एक साधू या मार्गागारून तीर्थयात्रा करत डोंगरावरील देवीला जात होता. त्यच्या जवळ तों शाली, दोन उपरणी, दोन पंचे आणि एक कमंडलू, एवढच समान होत. पण रस्त्याच्या चढणीमुळे त्याला एवढं समान ओझं वाटत होत, आणि घामाच्या धारा त्यांच्या अंगावरून वाहत होत्या. थोडं पुढ गेल्यावर त्याला एक ७० वर्षाची आदिवासी महिला ८ वर्षाच्या झाडावरून पडून पाय मोडलेल्या मुलाला, वैद्यकीय उतारासाठी पाठीवर घेऊन येत होती, असे दिसले. तो मुलगा धष्टपुष्ट होता. ती वृद्धा मोठ्या उत्साहान तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती.
ReplyDeleteसाधून त्या महिलेला विचारलं,"आजी इतकं ओझं घेऊन या वयाला तुम्ही ही उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढ्याशा ओझ्यान हैराण झालो आहे." त्या वृद्धेन साधूना नीट निरखून पाहिलं, आणि म्हणाली, "महाराज ओझं आपण वाहत आहात, हा तर माझा नातू आहे!"
तात्पर्य
ख-या प्रेमान केलेल्या गोष्टीच ओझं वतन नाही
- See more at: http://marathibodhkatha.blogspot.in/2012/06/blog-post_30.html#sthash.AGKkcC7Y.dpuf
प्राचीन काळाची गोष्ट. एका ऋषीच्या आश्रमात शंभर विधार्थी विद्यासंपादन करीत होते. गुरु शिकवीत होते, शिष्य शिकत होते. शिष्यांच अध्ययन संपल्यावर दीक्षांत समारंभात गुरुदक्षिणा द्यावयाची असते. शिष्यांनी गुरुवर्यांना विचारले, ' गुरुवर्य , आपण आम्हाला एवढ ज्ञान दिलत. आम्ही आपणाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो ; पण आपण त्यागी आहात, आपणाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? आपण सांगावे.'
ReplyDelete'शिष्यवृन्द्हो, मला अशी गुरुदक्षिणा आणा, जी जगात कोण्याच्याही उपयोगाची वस्तू नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा!'
मग शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र, पात्र, धान्य यांपैकी काहीही नको, कारण या सर्वांचा उपयोगच असतो.
एका शिष्याला एका झाडाखाली वाळलेली पाने दिसली. तो म्हणाला 'ही पाने निरुपोयोगी आहेत. तीच आपण गुरुदक्षिणा म्हणून देऊ.'
शिष्य पाने नेऊ लागले तेवढ्यात एक शेतकरी आला. तो म्हणाला, 'कसला नेता ही पानं? ती कुजवून मी खत म्हणून वापरतो. शेताला उपयोगी पडतात.'
शिष्य पुढे गेले. त्यांना काही वाळलेल्या काटक्या दिसल्या. त्यांची मोळी बांधून नेणार एवढ्यात काही स्त्रिया आल्या. म्हणाल्या, 'कशाला नेता ही काष्टे? ती जळणासाठी उपयोगी पडतात. त्यांवर आमचा स्वयंपाक होतो.'
शिष्य पुढे गेले. एकजण म्हणाला, 'आपण मातीच नेऊ या.'
'अरे बाबा, माती तर सर्वात उपयुक्त आहे. मातीतूनच वृक्ष उगवतात.' मग माती आणण्याचा विचार त्यांनी रद्द केला. ते अजून पुढे जात होते. एका लहानश्या ओढ्याकाठी ते आले. त्या ओढ्याच्य प्रवाहात एका पक्ष्याच भलं मोठं पीस वाहत येताना दूरवरून त्यांनी पाहिलं. एक शिष्य म्हणाला, 'हे पिसच आपण देऊया. ते निरुपयोगी आहे. पीस जवळ आल्यावर त्यांनी पाहिलं तर त्या पिसावर काही मुंग्या होत्या. त्या म्हणाल्या, 'आमचं वारूळ फुटलं. आम्हाला पलीकडे जायचं होत. आम्ही सर्वांनी मिळून हे पीस ओढलं आणि त्यावर बसलो. ही पीस आम्हाला उपयुक्त आहे.'
शिष्यांना समजल, कोणतीच वस्तू निरुपयोगी नाही. शिष्य निराश मानाने परतले.
गुरुवर्य म्हणाले, 'जगात कोणतीच वस्तू निरुपयोगी नाही, हे ज्ञान तुम्हाला झालं, हीच माझी गुरुदक्षिणा! जगाच्या उपयोगी पडा!'
तात्पर्य: ज्ञानाची उपयुक्तता प्रत्यक्ष कृतीत दिसली पाहिजे.
- See more at: http://marathibodhkatha.blogspot.in/2011/11/blog-post.html#sthash.KaZVBCsO.dpuf